Thursday, April 24, 2014

जीवन म्हणजे एक गाणं असतं,

असली वाट काटेरी तरीही मनसोक्त हुन्द्डायच असतं ......


कडु गोड आठ्वणींची घेउन शिदोरी पाठी,

हाती असावी आपुल्या आत्मविश्वासाची काठी,

प्रत्येक प्रसंगाला धैर्याने सामोरं जायच असतं

जीवन म्हणजे एक गाणं असतं,

असली वाट काटेरी तरीही मनसोक्त हुन्द्डायच असतं ......


इति,

आश्विन

Wednesday, April 8, 2009

माझे विनोदी लेखन

मला लिहिण्याचा नाद अगदी बाल वयापासून च लागला.नाहिम्हट्ल तरी माझ्या वयाच्या मानाने मी चांगले लिखाण करतो ,असा माझा समज झालेला!!! तो का झाला? हा कदाचित संशोधनाचा विषय ठरू शकेल. ते काहीही असो पण माझे लिखाण हे अगदी जोरात सुरु होते .प्रेमकविता , शेतकर्यांच्या समस्या, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार......माझा सध्याच्या परिस्त्थितिवर असलेला राग की मी स्वतः काहीच करू शकत नाही ही जाणीव, माझे लिखाण मात्र अगदी समृद्ध करीत होती.
वयापरतवे लिखाणात थोडाफार सुधार झाला , शब्दांचा खजिना वाढला अणि अणि माझे लिखाण अजुन जास्त वाचनिय होऊ लागले!!! हा तसा माझा समज (हो पुन्हा एकदा!!!!! )
विनोदी लेखन या एका प्रकारापासुन मात्र नि बराच लांब राहिलो. प्रयत्न केला नाही अस नाही पण त्याचि मजल "एक चांगला प्रयास" याच्यापुढे काही गेली नाही. प्रतिक्रिया देणारे सुध्दा अगदी सावध, म्हणजे कस "अश्विन, छान लिहिले आहेस रे, नविन प्रयत्न.... विनोदी लेखन!!! छान आहे" अस म्हण्ताना अगदी सत्यजीत रे यांचा एखादा गंभीर चित्रपट बघितल्या सारखे भाव आणायचे.आता पु ल देशपांडे आणि प्र के अत्रे या दोघांनी जर विनोदी लेखणांचे झेंडे अशा काहि उंची वर नेवुन ठेवले आहे कि तेथे जातांना माझ्यासारख्या पामराच्या तोंडी फेस येनार आणि मि पुन्हा माझी हतबलता च पांढर्‍यावर काळी करनार, ह्यात माझा दोष तो काय?
पण अस म्हणताना माझे इतर लेखन मि अगदीच विजय तेंडुलकरांच्या छ्त्रछायेतच केल अस मी कदापिहि म्हनणार नाही (असा माझा स्वता: चा समज झालेला असला तरिही!!!!!!!).
"हे , जे काही आहे ते चांगल आहे, पण पु ल ची मजा नाही!!" अशी प्रतिक्रिया देन म्हणजे भारताचे चंद्रायान बरं आहे पण ते अपोलो १३ होते ना ते फार छान होत अस होइल. अरे!!, ते US of A आहे आणि आम्हि विकसनशिल भारत, आम्ही आमच्या बळावर यान बनवल ते काय कमी होय??
असो माझे विनोदी लेखन हे अस अगदी टोकाच्या टीकेला बळी पडलेल. पण अशा टीकेला भीक न घालता मि माझे अनोखे असे विनोदी लेखन सुरुच ठेवनार आणि सत्यजीत रे ते चार्ली च्यापलीन हा खड्तर प्रवास मि नक्किच पुर्ण करनार!आणि या माझ्या विनोदी लढाईत तुमच्यासारखे असंख्य दर्दि वाचक मला साथ देतील, असा या एका (छे!!Struggling चा मराठी .....काय होता??????) लेखकाचा झालेला समज.
अश्विन.१३.०४.०९